Share

ठाकरे, पवार यांच्यासह १९ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींची महत्वाची बैठक

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. २०१४ सालापासून भाजपविरोधी पक्षांमध्ये मोठी मरगळ दिसून आली होती. याचाच परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आणि भाजपने केंद्रात अधिक यश मिळवत सत्ता स्थापन केली.

आता भाजप विरोधी पक्ष हे एकवटत असून त्यांनी पावसाळी अधिवेशनात विविध प्रकारणांवरून केंद्र सरकारची कोंडी केल्याची पाहायला मिळाले. आता सोनिया गांधी यांनी भाजपवरिओढी पक्षांना एक करून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी संसदेतील विरोधकांच्या एकीचं कौतुक केलं. संसदेच्या भविष्यातील अधिवेशनातही ही एकता कायम राहील. मात्र, आपल्याला बाहेरही मोठी राजकीय लढाई लढावी लागेल, अशी सूचना देखील केली.

पुढे त्या म्हणाल्या, ‘संसदेचे नुकतेच झालेले पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक महत्त्वाच्या आणि तातडीच्या मुद्यांवर चर्चा आणि वादविवाद करण्यास सरकारच्या आडमुठेपणा आणि उद्दामपणामुळे पुन्हा पूर्णपणे धुऊन गेले. यामध्ये प्रत्येक नागरिकाला प्रभावित करणारा पेगासस स्नूपिंग घोटाळा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणे आणि संघराज्यावर सातत्याने हल्ला करणे, यांचा समावेश आहे. असे असूनही, सर्व विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांमध्ये वीस दिवसांहून अधिक काळ निदर्शनास आणलेल्या बाबींमुळे हे सत्र चिन्हांकित केले गेले.’

यासोबतच त्यांनी केंद्राने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामागे देखील विरोधच कारणीभूत असल्याचं म्हटलं. ‘एक गोष्ट संपूर्णपणे विरोधी पक्षांमुळे होत आहे की, घटना दुरुस्ती विधेयकात मागास प्रवर्ग ठरवण्याचा आणि अधिसूचित करण्याचा दीर्घकालीन अधिकार राज्यांना देणात आला. तीन वर्षांपूर्वी सरकारने चूक केली होती आणि तुम्हाला माहीत आहे की हे विधेयक ती चूक सुधारण्यासाठी आवश्यक होते. मला विश्वास आहे की संसदेच्या भविष्यातील अधिवेशनातही विरोधकांची ही एकता कायम राहील. पण आपल्याला मोठी राजकीय लढाई संसदेच्या बाहेर लढावी लागेल,’ असं देखील सोनिया गांधी आपल्या भाषणात नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!