पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी एका कार्यक्रमात तसं वक्तव्य केलं होतं. पण, माझ्या वक्तव्याचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वक्तव्याचा काय संबंध होता.
‘मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा आणि माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते अकुंश काकडे यांनी भाष्य केले आहे.
‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे. त्यामुळे आपल्याला आपोआप प्रसिद्ध मिळते.’ असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच राज्यात जातीयवादी सरकार येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आणि त्यांची भाऊ बंदकी आहे. महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेनं स्विकारलं आहे. मुळात राज ठाकरे हे मुंबईत एक, नाशिकमध्ये दुसरंच बोलतात,’ असा खरमरीत टोलाही काकडेंनी यावेळी बोलताना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ‘हा’च एकमेव पर्याय – मुख्यमंत्री ठाकरे
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- आता पेट्रोलची दुसरी सेंच्युरी करण्यासाठी भाजप जनतेचा आशिर्वाद मागत असेल – नाना पटोले
- ‘रावसाहेब दानवे यांनी गोमूत्राचे सेवन कमी करावे, त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही’-हिशाम उस्मानी
- ‘आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका’; राज ठाकरेंच रोखठोक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

