पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा भ्रष्टाचाराचे केंद्र असलेल्या पक्ष आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, देश मागील ७ वर्षांपासून अधोगतीकडे जात आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. या दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपा आपली जबाबदारी झटकू पहात आहे. युपीए सरकारच्या काळातील ऑईल बाँडचे नाव पुढे करून मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने भरपूर नफेखोरी केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकारला अपयश आलेले आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच कोरोनाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
जनआशिर्वाद यात्रेचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष देण्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही. पेट्रोल डिझेलने सेंच्युरी पार केली असून आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जनतेचा आशिर्वाद मागत असावेत. या यात्रेदरम्यान भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस पुढे गुडघे टेकून शिवसेनेनं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’; भाजपची जहरी टीका
- ठाकरे, पवार यांच्यासह १९ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींची महत्वाची बैठक
- आता पेट्रोलची दुसरी सेंच्युरी करण्यासाठी भाजप जनतेचा आशिर्वाद मागत असेल – नाना पटोले
- ‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस ; पवारांसारख्या शक्तीस्थळावर हल्ला करताच आपोआप प्रसिद्धी मिळते’
- ‘आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका’; राज ठाकरेंच रोखठोक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

