Share

राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात आज ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान आता महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे. राज्यात आज आढळळेल्या डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये कोल्हापूर – ६, रत्नागिरी – ३, सिंधुदुर्ग – १ या रूग्णांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत आढळून आलेल्या ७६ रूग्णांपैकी पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने जारी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!