Share

‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले

Published On: 

मुंबई : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये काल प्रवेश केल्यानंतर काही तासांतच अध्यक्षीय प्रासादाचा ताबा घेतला आहे. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अमुरल्लाह सालेह हे दोघेही अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानमध्ये गेले आहेत. काबुल विमानतळावर विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, कर्मचारी, आणि अन्य अफगाणी लोकांनी आश्रय घेतला असून तिथे गोळीबार होत आहे.

शेकडो अफगाणी, सरकारी मंत्री आणि कर्मचारी, महिला आणि लहान मुलं विमानतळावर दाटीवाटीन बसून आहेत आणि देशातून बाहेर जाणाऱ्या विमानांची वाट पाहात आहेत. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरनं विमानतळावर आणलं आहे. एकूणच अफगाणिस्तान मधील स्थिती ही भयानक असून आता जो तो जीव वाचवून इतर देशात जाण्यासाठी धडपड करत आहेत.

अतिरेकी गटाला रोखण्यासाठी अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यामुळे आता विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात असून तेथील नागरिकांप्रती दुःख व सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अफगाणिस्तानातील स्थितीला अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. ‘एक गोष्ट 1 लाख सत्य आहे, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अफगाणी जनतेला वाऱ्यावर सोडले,’ असं ट्विट करून आव्हाड यांनी संताप व्यक्त करतानाच अफगाणिस्तानातील नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!