Share

‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’

Published On: 

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार, राज्यातील निर्बंध कालपासून शिथिल झाले. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा ठाकरे सरकारने दिली आहे. बहुतांशी निर्बंध ठाकरे सरकारने हटवले असले तरी सिनेमागृह आणि नाट्यगृह यांच्याबाबतचे निर्बंध हे कायम ठेवण्यात आले आहेत.

गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात सिनेमांना मोठ्याप्रमाणात OTT चे प्लॅटफॉर्म मिळाले असून ऑनलाईनद्वारे सिनेमांची चांगली चलती सुरु आहे. मात्र, महाराष्ट्राची किंबहुना देशाची ओळख असलेल्या नाट्यभूमीची, त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांची, कलाकार वर्गाची दुरावस्था झाली आहे. आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने काही निर्बंधांसह नाट्यगृहे सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

या मागणीसाठीच अभिनेत्या सोनाली कुलकर्णी यांनी एका फेसबुक पोस्ट केली असून किमान दोन्ही लस झालेले कलाकार, तंत्रज्ञ आणि मर्यादित प्रेक्षकसंख्या याद्वारे नाट्यगृहे सुरु व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

https://www.facebook.com/SonaliKulkarni.org/posts/411062027051230

‘जिम, शूटिंग, लग्न समारंभ, ट्रेन, खेळ, सगळंच उघडलंय मॅाल सुध्दा..सिनेमांना OTT चा पर्याय मिळालाय मात्र नाटकाचा पडदा उघडण्यासाठी अजून किती प्रतिक्षा? दोन्ही लस झालेले कलाकार, तंत्रज्ञ आणि मर्यादित प्रेक्षकसंख्या चालणार नाही का?’ असा सवाल सोनाली कुलकर्णी यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख हे आता दखल घेतील का ?  हे येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!