Share

पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका

Published On: 

सांगली : दोन वर्षांपूर्वी केंद्रसरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता.

पवारांच्या या टीकेला आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरक्षणाच्या मुद्द्यापासून नेहमी पळ काढणारे खासदार शरद पवार यांना अखेर ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडावी लागली. यातच बहुजनांचा विजय आहे,’ असं पडळकर म्हणाले. यासोबतच, ‘शरद पवार यांच्या करामतींमुळेच मराठा आरक्षण गेले असून आता अचानकपणे पवारांचे ओबीसींप्रतीचे प्रेम उफाळून का आले? जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना २०११ च्या जनगणनेचा जातीनिहाय अहवाल हवाय कशाला?’ असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.

पुढे पडळकर म्हणाले, ‘ शरद पवार हे कुठलेही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधी दाखवतही नाहीत. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे. केंद्राने ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै-पाहुण्यांच्या प्रेमामुळे? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केले. जेव्हा जेव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेव्हा तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले.’ असा घणाघात पडळकर यांनी केला.

शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका –

केंद्राने जातीनिहाय आरक्षणाचे राज्याचे अधिकार काढून घेतले. केंद्राने हे अधिकार पुन्हा बहाल केले अस बोलत आहेत, ही शुद्ध फसवणूक आहे. इंद्रा सहानी प्रकरणात आरक्षण 50 टक्के पेक्षा अधिक देता येणार नाही हे स्पष्ट आहे. असं असताना 2 वर्षांपूर्वी 10 टक्के ईसीबीसीचे आरक्षण दिलं. शरद पवारांनी पुढे म्हटलं, देशात जवळपास सर्वच राज्यात 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण अधिक आहे. यासोबतच शरद पवारांनी कुठल्या राज्यात किती टक्के आरक्षण आहे याची आकडेवारी सुद्दा वाचून दाखवली.

जेवणाला निमंत्रण दिले हात बांधून सांगताय जेवा आता असं म्हणत शरद पवारांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. 50 टक्यांचा निर्णय काढून टाका, जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे, जनगणनेशिवाय समान संधी मिळणार नाहीत. असं देखील शरद पवार यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!