Share

राज्यात आज ५ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात ५ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार २६२ इतकी आहे. कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९६.८४ टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे. मृत्यूचा दर २.११ टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १२.५८ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ३,७३,८१२ रुग्ण होम क्वारंटाइन, तर २५१२ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला आहे.

दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!