पुणे : पुणे शहरात आज नव्याने २५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९० हजार २२८ इतकी झाली आहे. शहरातील २४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७९ हजार २५७ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ३७१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ९५ हजार ८६३ इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार १२८ रुग्णांपैकी २०१ रुग्ण गंभीर तर २९६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८४३ इतकी झाली आहे.
दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेल्टा प्लस संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर आता शहरातही एक रुग्ण आढळला आहे. हडपसर मुंढवा परिसरात हा डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला असून पालिकेनं त्याला होम आयसोलेशनमध्येच ठेवलं आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य मित्र आणि नातेवाईकाचं शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड प्रकरणात खर-खोटे समजण्यासाठी व्हाइट पेपर काढा’ ; मुनगंटीवारांची मागणी
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
- ‘पुलवामासारखे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी भारतीयांची लस फुकट दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

