Share

मनपा हद्दीतील ९७२ शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणास सुरुवात, गरीब विद्यार्थ्यांकरीता स्वाध्याय पुस्तिका!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आरोग्या बरोबरच शिक्षणाकडेही महानगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महानगरपालिका हद्दीतील ९७२ शाळांमध्ये मंगळवार (दि.१५) पासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले असून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यात महानगरपालिकेच्या ७२ व खाजगी ९०० शाळाचा समावेश आहे.

याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने नवीन चार मराठी व चार उर्दू शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मनपा शाळेतील सर्व शिक्षकांनी मंगळवार पासून आपल्या शालेय परिसरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षी मनपातर्फे सातारा, देवळाई परिसरात चार मराठी माध्यम व मिटमिटा, जटवाडा, हिना नगर व चिकलठाणा या परिसरात उर्दू शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन शिक्षणात मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेट अभावी अनेक अडचणी येत आहेत. यासाठी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या माध्यमातून कृती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येणार आहे. कृतीपुस्तिका तयार करण्यासाठी महानगरपालिका शिक्षकांना शशिकांत उबाळे, तुषार ताठे, अश्विनी हिवर्डे, ज्ञानदेव सांगळे हे देणार आहेत.

या कृती पुस्तिका शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये पंधरा दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून दररोज अभ्यास करतील व काही अडचणी आल्यास विषय शिक्षकांना त्याबाबत विचारतील. पंधरा दिवसानंतर शिक्षक व पालकांमार्फत स्वाध्याय पुस्तिका जमा करून घेतील व पुढील पंधरा दिवसाची स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतील. यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील.

असे मत सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी व्यक्त केले. आज सकाळी मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी अनेक शाळांना भेटी देऊन कोरोना संदर्भात सूचनांचे पालन करण्यास शिक्षकांना सांगितले. व शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यास व ऑनलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. सर्व शाळांचा परिसर पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजून जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!