मुंबई : पगार वाढ व्हावी आणि नोकरीत कायमस्वरूपी म्हणून सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील 70 हजार आशा सेविकांनी आजपासून संप पुकारला आहे. आज विविध जिल्ह्यात आशा सेविका आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या. याअगोदर आरोग्यमंत्री राजेश टोपे आशा सेविकांशी चर्चा करत आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आशा सेविका आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
याच मुद्द्यावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलेले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या आशा सेविकांच्या जीवाशी न खेळता सरकारनं त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलीय. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेले दीड वर्ष कोरोना काळात आशा सेविकांनी काम केलं आहे, अजूनही करत आहेत. मात्र सरकारने आश्वासन वगळता त्यांना काहीच दिलं नाही. आरोग्य सुरक्षा नसताना, विमा कवच नसताना, योग्य मानधन मिळत नसतानाही आशा सेविका काम कर्तव्य बजावत आहेत. मात्र या कामाची राज्य सरकारला किंमत नाही. मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजरही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. अनेक आशा सेविकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागत असल्याची टीका भंडारी यांनी केली आहे.
तसेच ‘आशा सेविकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी राज्य सरकार घेत नाही. राज्य सरकारने गेल्या वर्षीपासूनच प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन 500 रु. प्रमाणे द्यावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. या संदर्भात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही झाली. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.’ असा आरोप भंडारी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
- ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षाही नाही ‘
- Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू
- ‘धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा’
- औरंगाबादेत भूमिगत गटार योजना झाली ‘भूमिगत’! मात्र नागरिकांकडून सक्तीने करवसुली सुरूच


