Share

राज्यात आज १४९१० रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात आज तर 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, काल ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती. राज्यात आज एकूण 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 360 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,78,34,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,98,550 (15.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!