पुणे : एसटी महामंडळ वर्धापन दिन सोहळा आज साजरा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवाई या एलेक्ट्रीनिक बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, या कार्यक्रमात त्यांनी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना सरकारची बचत करण्यासाठी माझी स्व:ताची खासगी गाडी वापरायचो पण आता मी ठरवले आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मजेशीर विधान केले आहे. ते पुण्यात बोलत होते.