🕒 1 min read
अहमदाबाद : गुजरात काँग्रेस चे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांची पत्नी रेश्मा पटेल यांनी बनवला आहे. भरतसिंह सोलंकी यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप रेश्मा पटेल यांनी केला आहे. याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाईही सुरू आहे.
रेश्मा पटेल यांना माहिती मिळाली की तिचा नवरा एका महिलेसोबत खोलीत बंद आहे. दरम्यान, रेश्मा पटेल यांनी काही लोकांसह तेथे पोहोचली आणि महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. व्हिडिओमध्ये रेश्मा महिलेला गुजराती भाषेत काहीतरी बोलताना दिसत आहे. रेश्मा पटेलसोबत आलेल्या लोकांनी महिलेचा व्हिडिओ बनवला. ती महिला आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते, यावेळी रेश्मा यांनी महिलेला चापट देखील मारली आहे.
Gujarat Congress leader Bharat Singh Solanki Extra Marital Affair…Wife Caught and Make video pic.twitter.com/JlHMZJZpTw
— Dheeraj sharma (@dheer23) June 1, 2022
भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत. रेश्मा आणि भरत सिंह यांच्या कायदेशीर लढाईबाबत दोघांनी वृत्तपत्रातून एकमेकांना अनेकदा नोटिसा पाठवल्या आहेत.यापूर्वी देखील पती-पत्नीने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. काही महिन्यांपूर्वी भरत सिंह सोलंकी यांच्यावर पत्नी रेश्माने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. रेश्मा म्हणाल्या की ती भरत सिंहला घटस्फोट देणार नाही. तिने पतीविरोधात बोरसद न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. काही वर्षांपासून दोघांमध्ये हा वाद सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
