दिल्ली : अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी म्हटलं आहे की, सरकार सूडाच्या भावनेने आंधळी झाली आहे. आम्हाला भयभीत करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन सरकारकडून करण्यात येत आहे. पण आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार ही नाही. ठामपणे या गोष्टीचा सामना करणार.
ईडीकडून नुकतेच यंग इंडिअन मध्ये आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्या मुळे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. यालाच नॅशनल हेराल्ड स्वामित्व हक्क प्राप्त आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वित्त शोध निवारण अधिनियमच्या गुन्हेगारी कलमान्वये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाआपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांचीही चौकशी करण्यात आली होती.
जे इंग्रजांनी केलं तेच मोदी सरकार करत आहे –
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, १९४२ मध्ये नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र सुरु करण्यात आलं होतं. त्याही वेळी इंग्रजांनी नॅशनल हेराल्डला दाबण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आज मोदी सरकार तेच करत आहे. यासाठी त्यांनी ईडीचा वापर सुरू केलाय.
महत्त्वाच्या बातम्या :


