मुंबई : वेस्ट इंडिजने क्रिकेटमध्ये जगाला अनेक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू दिले आहेत. त्यापैकी एक डेव्हिड हॉलफोर्ड हे होते. ज्यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी बार्बाडोस येथे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉलफोर्ड हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. हॉलफोर्ड हे फिरकी अष्टपैलू खेळाडू होते. लेग स्पिन गोलंदाजीव्यतिरिक्त ते मधल्या फळीत फलंदाजीही करायचे. हॉलफोर्ड यांनी १९६६ ते १९७७ पर्यंत वेस्ट इंडिजसाठी २४ कसोटी सामने खेळले आणि ५१ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना अष्टपैलू कामगिरी करत ७६८ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी गोलंदाजीत केलेली सर्वोत्तम कामगिरी १९७५ मध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या बार्बाडोस कसोटीत पाहायला मिळाली.
वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करण्याव्यतिरिक्त त्यांनी १९७० च्या दशकात बार्बाडोसचे कर्णधारपदही भूषवले. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोचीही कमांड त्यांनी सांभाळली होती. शिल्ड स्पर्धेत १००० धावा आणि १०० बळी घेणारे हॉलफोर्ड हे पहिला क्रिकेटपटू होता. १९७८ मध्ये झालेल्या कॅरी पॅकर मालिकेतही ते खेळताना दिसले होते.
CWI pays tribute to David Holford, former West Indies all rounder.
Full Tribute⬇️https://t.co/BJj4uJ1F9a
— Windies Cricket (@windiescricket) May 31, 2022
फलंदाजीने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या
त्यांनी १९६६ मध्ये इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर अष्टपैलू म्हणून फलंदाजीत आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. जिथे त्याने गॅरी सोबर्ससोबत १२७ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या पुढच्या कसोटीत त्यांनी १०५ धावांची खेळी खेळून सामना वाचवला होता. त्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या ५ विकेट अवघ्या ९५ धावांत पडल्या होत्या. यानंतर त्यांनी शतकी खेळी खेळली करत सोबर्ससोबत २६० धावांची भागीदारी केली होती. वेस्ट इंडिजने ती मालिका ३-१ ने जिंकली होती.
भारताविरुद्ध २३ धावांत ५ बळी घेतले
१९७५ मध्ये खेळल्या गेलेल्या बार्बाडोस कसोटीत २३ धावांत ५ गडी बाद करताना हॉलफोर्ड यांनी गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी भारताविरुद्ध केली होती. त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताचा एक डाव आणि ९७ धावांनी पराभव केला होता.
वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त ते नंतर त्याच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले होते. विंडीज क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे शिवनारायण चंद्रपॉल. त्यांनी चंद्रपॉलच्या प्रतिभेची पारख करून त्याला विंडीज संघात आणले होते. क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष रिकी स्कर्ट यांनी हॉलफोर्ड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांनी क्रिकेट वेस्ट इंडिजसाठी दिलेल्या योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

