Share

लसीकरणाला गती देण्यासाठी, औरंगाबादेत लस न घेता रस्त्यावर फिराल तर बसेल ५०० रुपयांचा दंंड!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेत लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक केंद्रावरील गर्दीत भांडणे देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरी लाट ओसरताच आता लसीकरण केंद्रे ओस पडताना दिसून येत आहेत. सध्या ४५ वर्षांवरील नागरिक लस घेण्यासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर मनपाच्या नागरिक मित्र पथकाकडून नागरिकांनी लस घेतली किंवा नाही याची तपासणी केली जाईल. लस न घेता जर कोणी रस्त्यावर फिरत असेल तर त्यांना दंड केला जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. जम्बो लसीकरण मोहिम औरंगाबाद पालिकेने सुरू केली. सुरुवातीस महापालिकेला लसीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा ते अकरा हजार जणांचे लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या.

दरम्यान १ जून पासून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने लसीकरण सुरू केले व त्यानंतर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर पहिला तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोजी रोडावली आहे. ४५ वर्षांवरील सुमारे तीन लाख नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतलेली नाही. पालिकेच्या माध्यमातून शहरात आजवर ३ लाख ११ हजार ४६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पाडळकर यांनी सांगितले की, शहरात ४५ वर्षावरील सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक आहेत. त्यापैकी पावणे दोन लाखांपेक्षा कमी नागरिकांनी लस घेतली आहे. उर्वरीत ३ लाख नागरिक लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लस घेतलीतर कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लस न घेता रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!