औरंगाबाद : कोरोनाच्या तिसर्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याचा इशारा तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यामध्ये पालिकेच्या मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये ५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. तर एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये शंभर खाटांची व्यवस्था असेल. या खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील असणार आहे. बालकांवरील उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण सध्या दहा टक्के आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत हे प्रमाण वाढण्याची शक्यता असून पालिकेने बालकांसाठी स्वतंत्र अडीचशे खाटांची व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. यात विशेषतः शंभर खाटा आयसीयू असणार आहेत. राज्य सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांचा टाक्स फोर्स यासाठी तयार केल्या जात आहेत.
जिल्हास्तरावर आणि महापालिकेच्या स्तरावर देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने तयारी सुरु केली आहे. पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत काही बालरोग तज्ज्ञांची बैठक दोन वेळा घेण्यात आली, त्यातून कोणत्या प्रकारे उपाययोजनांसाठी तयारी केली पाहीजे, याबाबतच्या सूचना पुढे आल्या.
त्या सूचनांनुसार पालिकेने आता तयारी सुरु केली आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी माध्यमांना सांगिततले की, औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या सुमारे ऐंशी हजारांच्या घरात आहे, त्यापैकी आठ हजार बालकांची संख्या आहे, म्हणजे कोरोनाबाधित बालकांची संख्या दहा टक्के आहे. तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने तयारी सुरु केली आहे. बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्रपणे अडिचशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यापैकी गरवारे कंपनीच्या माध्यमातून शंभर खाटांची व्यवस्था केली जाणार असून त्या खाटा आयसीयु पध्दतीच्या असतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ३० वर्षात शासकीय सुविधेपासून वंचित असलेल्या ‘या’ गावाला मिळणार दिलासा
- ‘…त्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार’ ; कर्नाटकात राजकीय भूकंप होणार ?
- बेकायदेशीर मोबाईल टॉवर प्रकरणी जागरुक नागरिकांनी तक्रार करताच मनपास आली जाग!
- ‘कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात’, अरविंद सावंतांचा संभाजीराजेंना टोला
- सकारात्मक! बीड जिल्ह्यातील कोरोनाचे ३० कोविड सेंटर बंद


