पुणे : महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई, पुण्यासह दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भातील वॉर्ड रचनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजितदादांनी एकचा, दोनचा वॉर्ड करावा किंवा त्यांनी तिघांनी एकत्र लढावे… तरीही महाराष्ट्रातील या दहा महापालिकांमध्ये भाजपाच सत्तेत येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला काडीमात्र रस नाही, असा टोलाही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी लगावला आहे.
‘मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड आणि इतर महापालिकांसाठी दोन सदस्यीय वॉर्ड रचना करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवारांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत, असं दिसतंय,’ अशी खोचक टीका संजय काकडे यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘वॉर्ड रचनेबद्दल त्यांची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांना एकच सांगायचं आहे की, तुम्ही एक, दोन सदस्यीय वॉर्ड रचना करा… तुम्ही तिघे एकत्र लढा… परंतु, जनतेच्या मनात मात्र फक्त मोदी आहेत. ज्यापद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्पित भावनेने जनतेची सेवा करीत आहेत. त्याच भावनेने भाजपाचे सर्व नेते व कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाचे काम, कार्य यावर महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार आहे,’ असा विश्वास देखील काकडे यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- अजितदादा शांत झोपा…आम्हाला सरकार पाडण्यात काडीमात्र रस नाही – संजय काकडे
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
