औरंगाबाद : अनाड येथील बरड वस्तीला मागील ३० वर्षांपासून कोणत्याही शासकीय मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, याबाबतचे वृत्त अनेक वर्तमान पत्रात प्रकाशीत होताच. मा.जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने आज सिल्लोड चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व सिल्लोड महावितरण चे उप कार्यकारी अभियंता यांनी अनाड बरड वस्तीला तात्काळ भेट देऊन मूलभूत समस्यांचा आढावा घेतला.
मागील काही दिवसांपासून वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर अनाड येथील बरड वस्तीवरील समस्या या विषयी व्हिडीओ व बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. बरड वस्तीला उपविभागीय अधिकारी यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. नागरिकांच्या समस्या जानुन घेत, बरड वस्तीवरील विज, पाणी, रेशन यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ आदेश दिले. पुढील काही दिवसात या समस्या प्राधान्य क्रमाने मार्गी लावल्या जातील असे यावेळी बोलतांना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, महावितरण चे सिल्लोड महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, ग्रामविकास अधिकारी आर.जी.पठाण ,सरपंच रामकोरबाई बिरारे, उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य गजानन गदाई, भागवत शिंदे, अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके ज सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गोंडे तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पवार आदींसहित वस्तीवरील नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

