औरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक विभागात जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगाराचे भिजत घोंगडे कायमच डोकेदुखी ठरत होती. शासन निर्णय असताना देखील वेतन एक तारखेला कधी झाले नाही. शिक्षक संघटनांनी विविध आंदोलन, निवेदन देऊन ही पालथ्या घड्याावर पाणीच, असे वातावरण होते.
त्यावर पर्याय म्हणून सीएमपी प्रणाली असल्याने, एक तारखेला सीएमपी प्रणाली द्वारे वेतन झाल्यास शिक्षकांच्या अनेक अडचणी सुटु शकतात म्हणूनच एप्रिल/मे २०२१ मध्ये शिक्षकांनी ऑनलाईन आंदोलनाचे शस्त्र उगारुन औरंगाबाद जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी १० मे ते २५ मे या पंधरा दिवस ऑनलाईन आंदोलन केले होते.
कोरोना व लॉकडाऊनमुळे घरातूनच एक फलक हातामध्ये घेत तोंडाला मास्क लावून फलकावर आंदोलनाचा नेमका हेतू/विषय काय हे सुचीत केले गेले व रोज दोनशे फोटो मुख्यमंत्र्यांपासून तालुक्यातील गट शिक्षणाधिका-यांना ऑनलाईन पध्दतीने पाठवून अनोखे आंदोलन सुरू केले होते. त्यास यश मिळण्याचे चिन्ह आता दिसत आहे. एप्रिल २०२१ चा पगार हा सीएमपी प्रणालीद्वारे होणार असल्याचे समजले आहे. शिक्षक समितीचे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी प्रशासनाचे व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

