Share

सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू युनिटमध्ये मागील काहीदिवसांपासून उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याघटनेसंदर्भात निषेध व्यक्त करणाऱ्या कुटुंबीयांसोबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका राजूल पटेल(Rajul Patel) यांनी साधलेल्या संवादामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जेव्हा अॅडमिट केलं, तेव्हा आम्हाला विचारलं होतं का?, असा सवाल पटेल यांनी मृत बालकांच्या पालकांना केला आहे. त्यामुळे शिवसेने विरोधात संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’निबर कातडी, सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं’, असे ते म्हणाले. तसेच येत्या निवडणुकीत जनता हा माज उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भातखळकरांनी दिला.

दरम्यान, मृत बालकांच्या पालकांनी ‘आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळे या नाकर्तेपणाची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी’, असे म्हणत संताप व्यक्त केला असता त्यावर आक्रमक होत राजूल पटेल म्हणाल्या की,’आमची कसली जबाबदारी आहे? निवडून दिलं म्हणजे असं थोडी होतं? कसली जबाबदारी स्वीकारायची? जेव्हा अॅडमिट केलं, तेव्हा आम्हाला विचारलं होतं का जबाबदारी स्वीकारायला? जबाबदारी स्वीकारायला कुठली आहे?’, असा सवाल पटेल यांनी पालकांना केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!