टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भारती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही मेगा भरती झाली आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव भाजप वासियांचे स्वागत केले. तर विरोधकांना चांगलीचं टोलेबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपात येणाऱ्या नेत्यांना आम्ही कोणताही धाक आणि प्रलोभन दाखवली नाही. तर ती स्वतः हून जनतेच्या इच्छेने भाजपात आली आहेत. भाजपने सत्तेचा वापर करून फोडाफोडीच्या राजकारणाका सुरवात केली आहे, असा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

तसेच मधुकर पिचड यांच्या सारखे ज्येष्ठ नेते आज भाजपात आले आहेत. त्यामुळे आता आमच्या मागे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. अशा थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभावे यासाठी आम्ही आधी ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना पक्षात घेतले. त्यानंतर आपोआपचं ज्येष्ठ नेते देखील पक्षात आले. नगरमध्ये खा. सुजय विखे यांना आधी पक्षात घेतले. मग राधाकृष्ण विखे पाटील यांना घेतले. माढ्यात ही रणजितसिंह मोहिते पाटील यांना आधी पक्षात घेतले. त्यानंतर विजयसिंह आले. आणि आता देखील वैभव पिचड यांना पक्षात घेतले त्यामुळे मधुकर पिचड यांच्यासारखे मोठे नेते आम्हाला मिळाले, अशा मिश्कील शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत केले.

या नेत्यांच्या येण्याने भारतीय जनता पार्टीचा आता परिवार विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिनिधित्वामुळे देशातल्या सामान्य माणसाला ही वाटल की देशात आता परिवर्तन होत आहे. केवळ घोषणा होत नसून त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे देश आता बलाढ्य देश म्हणून ओळखला जात आहे, असे देखील फडणवीस म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

