मुंबई : मेट्रो प्रकल्पावरुन सुरू झालेले राजकारण अजूनही सुरूच आहे. या प्रकल्पासाठी कार शेड उभारण्याच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद सुरू आहे. शिवसेनेच्या अहंकारामुळे या प्रकल्पाची किंमत वाढली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलाय. त्यामुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोपही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलाय.
या संदर्भात अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. भातखळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे भुयारी मेट्रो रेल्वे ३ चा प्रकल्प खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. कार शेड विवादामुळे आजपर्यंत या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली आहे. आपला अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकारने चालवले आहे.’
फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेले मेट्रो कार शेडचे काम अजूनही रखडलेले आहे. त्या वेळी शिवसेना आणि भाजप सत्तेत होते. त्याच वेळी शिवसेनेने या कारशेडच्या जागेला विरोध केला होता. त्या नंतर विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागली आणि निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. आता शिवसेनेने कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, या सर्वात प्रकल्पाची किंमत वाढली असून यामुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
