🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. यातच आता नवी मुंबईमध्ये या आजाराचे तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या 29 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे नवी मुंबई मनपा हद्दीतील आहेत. तर इतर 15 रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 3 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. संबंधित रुग्ण हे 10 मे नंतर आढळले आहेत. सर्व रुग्णांवर नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा प्रश्नासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, या रुग्णांना एम्फोटेरीसीन-बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रमध्ये या इंजेक्शनचा कमतरता जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना एक फोन आणि राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता जाहीर
- ‘पवारांना त्या उपसमितीचे प्रमुख करणं म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं’
- जीएसटी अनुदान देण्यात शासनाकडून विलंब, पालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा!
- विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना तपासणीसाठी पुन्हा एकदा पथकांची वाढ!
- तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
