🕒 1 min read
वॉशिंग्टन: कोरोना नंतर जगाचे लक्ष वेधले होते ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे यामध्ये निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालांमध्ये मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत पराभव झाल्यानंतर त्यानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड सुरूच होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.
याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सर्थकांना संबोधित होते. लोकशाही आणि महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला लाजवणारी या हिंसाचाराची गंभीर दखल घेत. ट्वीटरने डोनाल्ड ट्रम यांचं अकाऊंट ब्लॉक केलं होत. तर त्यांचे शेवटचे तीन ट्वीट डिलीट करण्यात आले आहेत. 12 तासांसाठी ट्रम्प यांचं अकाऊंट ट्वीटरनं ब्लॉक केलं आहे.
कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचाराच्या बातमीवर फेसबुक न्यूजरूमने देखील ट्वीट करून डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन धोरणांचं उल्लंघन केल्यानं आम्ही त्यांच्यावर हिंसाचाराच्या धोरणाखाली कारवाई करत असल्याचं सांगितलं होत.
मात्र, त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
https://twitter.com/TwitterSafety/status/1347684877634838528
ट्विटरच्या या कारवाईमुळे अध्यक्ष ट्रम्प यांची टिवटिव कायमची थांबली आहे. या कारवाईमुळे ट्रम्प पुन्हा अकाऊंट सुरू करू शकत नाही. ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊंट बंद करताना प्रोफाईल फोटो काढला आहे. ट्रम्प यांचं खातं बंद करण्यापूर्वी त्यांचं ८८.७ मिलियनच्याजवळ फॉलोअर्स होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयनराजे कडाडले
- शेतकऱ्यांनी दिला ‘जिंकू किंवा मरू’चा नारा; सरकार-शेतकरी यांच्यातील आठवी फेरी देखील निष्फळ
- ‘तुम्ही जर भारतविरोधी असाल तर तुम्हाला काम/बक्षिसे मिळतील, मात्र राष्ट्रवादी असाल तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

