Share

पत्नीच्या अनैतिक संबंधांला कंटाळून पतीने घेतला गळफास

Published On: 

बीड : मागील काही काळापासून कुटुंब कलहात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पण या कलहाचे मुख्य कारण मुख्यतः अनैतिक संबंध असल्याचे ही निदर्शनात आले आहे. अशा अनेक घटना सध्या राज्यात घडत आहेत. अशीच घटना बीड येथे घडली घटनेने जेव्हा गंभीर रूप घेतले तेव्हा ही बाब समोर आली. एका विवाहित स्त्रीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते ही बाब तिच्या नवऱ्याला कळल्यावर त्यांनी त्याचा विरोध केला. पण त्याला न जुमानता त्या स्त्रीने आपले संबंध ठेवल्याने, पटीने आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत तरुणाच्या भावाने आष्टी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आष्टी तालुक्यातील वाहन चालकाच्या पत्नीचे भावकीतील तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. याबाबत पतीने त्याच्या भावाला सांगून पत्नीची समजूत घालण्यास सांगितलेे. त्यामुळे शनिवारी भावाने पत्नीसह पुण्याहून येत भावजयीला व तिच्या प्रियकराला बोलावून घेतले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

या वेळी त्या पतीनेही पत्नीच्या प्रियकराला तिला फोन करू नको किंवा भेटू नकोस असे सांगितले. परंतु, त्या दोघांनीही त्यास नकार दिला. उलट तूच आमच्या प्रेमाच्या आड आलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी पतीला धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रियकरा पाठोपाठ पत्नी घरातून निघून गेली. अखेर पतीने बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी व तिच्या प्रियकरावर अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!