टीम महाराष्ट्र देशा : आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक घोषित केलं जाणार आहे. आज दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.
२०१९ ची विधानसभा निवडणूक ही किती टप्प्यात होणार यांची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडली होती. परंतु यंदा महाराष्ट्रातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक ही दिवाळीपूर्वी होणार की दिवाळीनंतर यांची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
दरम्यान, २०१४ साली १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. परंतु यावेळी आचारसंहिता लागू होण्यास उशीर झाला आहे त्यामुळे मतदान आणि निकाल उशिरा लागू शकतो.
- जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी मंत्रालयावर धडकणार!
- ‘आमचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वीचं ठरलायं’
- कोकणात शिवसेना मी आणली, पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील – राणे
- निवडणूक लढवायची की नाही ? आम्ही राजसाहेबांच्या आदेशाची वाट पाहत आहोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

