टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या आठवड्यात त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोलले जात आहे. खुद्द राणे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, त्यामुळे शिवसेनेचा आक्षेस असण्याचं कारण येत नाही. येत्या आठ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यापूर्वी कोकणात मीच शिवसेना आणली, आता पुढील निवडणुकीत दोन्ही खासदार भाजपचे असतील, अस नारायण राणे यांनी म्हंटले आहे.
भाजप शिवसेनेची युती होईल अथवा नाही याच्याशी माझा संबंध नाही. माझे बोलणे मुख्यमंत्र्यांशी सुरु आहे. युतीवर बोलण्याचं माझ काही कारण नाही. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना कार्यकर्ते माझ्यासोबत आले, कांग्रेस सोडून पक्ष काढला तेव्हाही माझ्यासोबत आले, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्याबरोबर भाजपात येतील, असं राणे म्हणाले आहेत.
येत्या दोन तीन दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

