टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेत युतीच्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून केवळ चर्चाच सुरु असल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक गोंधळात दिसत आहे. अशातचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वीचं ठरलायं असं विधान केले आहे ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना 126 जागा, तर भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला 162 जागा मिळाल्या असल्याचे वृत्त आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी देखील याला हिरवा कंदील दिल्याचं बोलले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे २२ सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत, यावेळी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयी भाष्य केले आहे. पाटील यांनी युतीचा फॉर्मुला ठरलेला नाही असं विधान केले आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात ज्या वावड्या उडवल्या जात आहेत त्यांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे युतीत पुढे नक्की काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केलं होत, खासदार संजय राऊत यांनी देखील रावते यांच्या विधानाचे समर्थन केले होते. त्यामुळे युतीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
- राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठवणे ही शरद पवारांचीचं खेळी, वंचित नेत्याचा गंभीर आरोप
- पवारांच्यापुढे मोठ्या आवाजात राडा घालणाऱ्या ‘या’ युवा नेत्याने केला सेनेत प्रवेश
- ‘छत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला’
- मोदी आणि के. सीवन यांच्यामुळे मिशन चांद्रयान अपयशी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

