Share

‘उस्मानाबादेत सेनेचे तीन आमदार, एक खासदार; तरीही विकासकामांकडे दुर्लक्ष’

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी पत्र पाठवले. यात जिल्ह्याने सेनेचे तीन आमदार, एक खासदार निवडून दिले. तरी, विकासकामांकडे दुर्लक्ष आहे. २२ महिन्यात जिल्ह्यासाठी एकही बैठक घेतली नसल्याची खंत व्यक्त केली.

त्यांनी म्हटले की, अतिमहत्त्वाच्या कामांसाठी केंद्र सरकारला प्रस्तावाची तर काहीकरिता केवळ पाठपुराव्याची गरज आहे. मात्र, त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष आहे. या पत्रात पाच मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमदार, खासदार सेनेचे असताना विकासकामे होत नसल्याने नागरिकांत जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सकारात्मक असताना राज्य सरकार सहकार्य करत नाही. आपण महाराष्ट्राचे प्रमुख असल्याने जिल्ह्याच्या वतीने मी न्यायाची मागणी करत आहे.

तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्पात २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उस्मानाबाद येथील कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्पाची औपचारिक घोषणा केली होती. केपीएमजी कन्सल्टन्सीने प्राथमिक अहवालही तयार केला होता. त्यास एमआयडीसीने राज्य सरकारच्या मंजुरीने हा प्रस्ताव केंद्रास पाठवायला सांगितला होता. मात्र, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही फायदा झाला नाही. केंद्र सरकार त्यासाठी निधी देणार असुनही यावर निर्णय घेतला नाही. दहा हजार पेक्षा जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला हा प्रस्तावित प्रकल्प केवळ राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित आहे.

सोलापूर-तुळजापूर -उस्मानाबाद रेल्वे मार्ग तीर्थक्षेत्र तुळजापूरला रेल्वेला जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या प्रकल्पाला २०१९ साली रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पास राज्य सरकार ५० टक्के निधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे जलदगतीने या प्रकल्पाचे काम सुरू झाले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही एक रुपयाही तरतूद केली नाही असा आरोप राणा पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!