🕒 1 min read
औरंगाबाद : वीज पुरवठ्याच्या रोहित्रांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी ता.२५ घोसला ता.सोयगाव येथे घडली. या आगीमुळे गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभिजित गौर यांचेसह पथकांनी धाव घेऊन घटना नियंत्रणात आणली व गावाच्या वीज पुरवठा पाच तासांच्या अथक प्रयत्नाने सुरळीत केला. त्यामुळे काही काल ग्रामस्थ घाबरले होते. या आगीत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे महावितरणच्या वीज मंडळाने स्पष्ट केले आहे .
जरंडी वीज उपकेंद्रातून घोसला फिडर द्वारे गावाला वीज पुरवठा करण्यात येतो, गुरुवारी अचानक दाब वाढल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. वीज पुरवठ्याच्या तीन रोहित्रात आग लागली. सरपंच सुवर्णा वाघ यांनी तातडीने घटनेची माहिती महावितरणला दिली. कनिष्ठ अभियंता अभिजित गौर,वीज कर्मचाऱ्यांचे तीन पथक दाखल झाली.
रोहित्रांची आग नियंत्रणात आणण्यासाठी ज्ञानेश्वर वाघ,चंदू पाटील,ज्ञानेश्वर युवरे आदींनी मदत केली. त्यामुळे अनर्थ टळला घटनेनंतर महावितरणच्या पथकांनी तब्बल पाच तास अथक परिश्रम घेऊन गावाचा वीज पुरवठा सुरळीत केला.
महत्त्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितीन गडकरी म्हणाले, ‘या’ गोष्टीची होणार ‘लिम्का बुक’मध्ये होणार नोंद
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
