औरंगाबाद : रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार मराठवाड्यातून दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत. कोल्हापूर – नागपूर – कोल्हापूर आणि तिरुपती – श्री साईनगर शिर्डी – तिरुपती या गाड्या नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशासाठी कोविड काळात ही एक आनंदाची बातमी आहे.
अशा प्रकारे असेल गाड्या
गाडी संख्या 07417 तिरुपती-श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी : हि गाडी दिनांक 6 एप्रिल पासून तिरुपती येथून दर मंगळवारी सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि गुंटकळ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता पोहोचतील. गाडी संख्या 07418 श्री साईनगर शिर्डी – तिरुपती- (साप्ताहिक)
विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी :
हि गाडी दिनांक 7 एप्रिल पासून श्री साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी रात्री 19.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटकळ मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री 22.10 वाजता तिरुपती येथे पोहोचतील. गाडी संख्या 01404 कोल्हापूर ते नागपूर (द्वी-साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर सोमवारी आणि शुक्रवारी : हि गाडी दिनांक 12 मार्च, 2021 पासून कोल्हापूर येथून दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता पोहोचेल. गाडी संख्या 01403 नागपूर ते कोल्हापूर (द्वी-साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी आणि शनिवारी हि गाडी दिनांक 13 मार्च, 2021 पासून नागपूर येथून दर मंगवारी आणि शनिवारी दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक


