औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनात विद्यार्थी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांना परीक्षा विभागात विविध कामासाठी यावे लागते.
सध्या ‘कोविड‘ मुळे बरीचशी कामे ‘ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क, निकाल, पुनर्मुल्यांकन, पदवी, मायग्रेशन यासह विविध कामासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा विभागात संपर्क करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया सुलभरितीने राबवता यावी, या हेतूने विद्यार्थी सुविधा केंद्र परीक्षा सुरु होण्यापुर्वी चालु करण्याचे आदेश कुलगुरुंनी दिले होते. त्यामुळे राजर्षी शाहु परीक्षा भवनात विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी केले.
यावेळी परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, डॉ. प्रताप कलावंत यांची उपस्थिती होती. परीक्षा भवनला संपर्क करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना कुलगुरुंनी दिल्या आहेत. या केंद्राचे समन्वयक नितीन गायकवाड (स्वीय सहायक, परीक्षा मंडळ संचालक) , वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गांगुर्डे यांची नियुक्ती केली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक


