औरंगाबाद : महाराष्ट्रभरामध्ये कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मागच्या वर्षी मार्च मध्ये तसेच यंदाच्या कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांच्या तब्येतीची काळजी घेण्यामध्ये सरकार अपयशी ठरले असल्याचे, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परभणीमधील जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी सरकारवर तोफ डागली.
दरम्यान कोराेनाचा संसर्ग तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिसांनी डोळ्यात तेल घालून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता राज्यातील कानाकोपऱ्यात कडक सेवा बजावली. या दरम्यान ते स्वत: च्या कुटूंबापासून देखील दुर होते. तर अनेक पोलिसांचा ऑन ड्यूटी मृत्यू देखील झाला. पोलिसांच्या घरे बांधण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा. त्यांच्या कुटूंबियांची काळजी घ्यावी. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये शेतकरी, कामगार, कर्मचारी, उसतोड कामगारांची उपासमार झाली. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील बोर्डीकर यांनी या वेळी केली.
मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार वसतीगृहाला निधी ठाकरे सरकारने उपलब्ध करुन द्यावा. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हे आदेश दिले होते. ते पुन्हा निधी देवून मराठा समाजावरील अन्याय दुर करण्याची मागणी देखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक


