सातारा : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.
मात्र, आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांसह भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर, खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे.
त्यांची दोन दिवसांपूर्वीची पत्रकार परिषद चांगलीच गाजली होती. त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत नेत्यांना लक्ष्य केलं होतं. आज पुन्हा एकदा उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
‘मराठा आरक्षणात राजकारण नको. स्वार्थासाठी एकत्र येणा-या लोकांना समाजाने बाजू केलं पाहिजे. सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, माझ्या जीवाला तिच्यापासून धोका आहे’
‘या’ केस प्रकरणी सलमान खान आज कोर्टात गैरहजर
एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारणार – शेट्टी
शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत?, राजू शेट्टी आक्रमक
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


