Share

‘या’ केस प्रकरणी सलमान खान आज कोर्टात गैरहजर

Published On: 

मुंबई । लॉकडाऊन मुळे रखडलेले बॉलीवूड मधील प्रोजेक्ट पुन्हा एकदा  सुरु झाले आहे. अनलॉक नंतर सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बराच व्यस्थ आहे.

दरम्यान काळवीट शिकारप्रकरणी आज 1 डिसेंबर सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

काळवीट शिकारप्रकरणी राजस्थानच्या सेशन कोर्टामध्ये सलमानची सुनावणी होती. सलमानने स्वत: तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं. पण मुंबई आणि राजस्थानमध्ये कोरोना भरपूर वाढला आहे. त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही. असं कारण देत सलमानने तिथे जाण्याचं टाळलं. विशेष म्हणजे, सलमान खानला 5 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणात दुय्यम कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

त्यानंतर सलमानने शिक्षेविरोधात जिल्हा आणि सत्र जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. त्याचबरोबर आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने एक आव्हान दिले आहे. आज या दोन्ही खटल्यांची सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!