Share

‘माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, माझ्या जीवाला तिच्यापासून धोका आहे’

Published On: 

नवी दिल्ली- दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची म्हणजेच जेएनयूची माजी विद्यार्थी नेता असणाऱ्या शेहला रशीद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शेहला यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केल्यामुळे त्या यावेळी चर्चेत आल्या आहेत.

अब्दुल रशिद शोरा यांनी आपली मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, आपल्याला तिच्यापासून धोका असल्याचं म्हटलंय. तसं पत्रच अब्दुल राशिद शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवलं आहे. इतकच नाही तर शोरा यांनी आपली पत्नी जुबैदा शौर, मोठी मुलगी आसमा रशीद आणि एक पोलिस कर्मचारीही शेहला रशीद सोबत असल्याचा आरोप केला आहे.

यासंदर्भातील पत्रच शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. आपली पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही शेहलासोबत या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे.

जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे. आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशा विषयासंदर्भातील तीन पाणी पत्र शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!