Share

एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारणार – शेट्टी

Published On: 

कोल्हापूर : नव्या कृषी कायद्यांविरोधात सहा दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अस देखील शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

आता दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’ने राज्यभर आंदोलन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं या आंदोलनात त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं तर आंदोलनादरम्यान धक्काबुक्की देखील झाली.

दरम्यान, यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे असून कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. येत्या 2 दिवसांत जर सरकारने तोडगा काढला नाही तर एकही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारू. असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणरे अमित शहा कोण आहेत? असा सवाल करत आमचं संपूर्ण आयुष्य लढण्यात गेलं आता संपूर्ण देश पेटविल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार देखील शेट्टी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!