Share

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे कन्नड ग्रामीण रुग्णालयाला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

Published On: 

औरंगाबाद : कोरोना रुग्णसेवा अंतर्गत ऑक्सिजनची कमी बघता, ग्रामीण भागात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूजच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयासाठी ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेंटर यंत्र देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार,संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, कृषिभूषण अजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थित हि उपकरणे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री श्री ग्रीनकल्चरच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यात आले.

देशातील कोव्हिडची गंभीर परिस्थिती व ऑक्सिजनसह इतर साहित्याची कमरता लक्षात घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या संस्थांच्या वतीने देशभरातील कोव्हिड रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मास्क आदींसह जीवनरक्षक प्रणालींचे वाटप करण्यात येत आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील रुग्ण शहरात रेफर करावे लागणार नाही. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास प्राण वाचण्यास मदत होईल.
या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक सुधीर चापते,रचना चापते,दिनेश जाधव,शरद डोलारकर यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारीव नागरिक उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याची समस्या जाणवली होती. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने तिचा सामना करण्यासाठी आमची सर्व वैद्यकीय यंत्रणा तयार असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेर यंत्रणेमुळे आली आहे ग्रामीण रुग्णालयास रुग्णसेवा करण्यास मोठी मदत होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!