औरंगाबाद : वैजापूर-येवला रस्त्यावर तालुक्यातील नांदगाव जवळ अल्टो कार (एमएच १३ डीई ६९६६) व टाटा एसी जीप यांची समोरा समोर धडक होऊन तीन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी दि.२१ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
शाईन इम्रान पठाण (२८), शकील अन्सारी (४७) रा.येवला व जीप चालक आनंद विनायक चव्हाण (४५) रा.औरंगाबाद हे तिघे या अपघातात जखमी झाले. अल्टो कार गंगापूरहून येवल्याकडे जात होती. तर टाटा एसी ही गाडी नाशिक हून औरंगाबाद कडे जात होती. त्यावेळी नांदगाव जवळ दोन्ही गाड्यांची समोरा समोर धडक होऊन हा अपघात घडला.
या अपघातात तिघे जखमी झाले. तर अल्टो गाडीचे या अपघातात मोठे नुकसान झाले. अल्टो कारमधून ५ जण प्रवास करत होते. टाटा एसी गाडीचे चालक चव्हाण या अपघातात जखमी झाले. वाहेद पठाण व बब्बू फौजी यांनी जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार केल्यानंतर दोन जणांना पुढील उपचारासाठी येवला येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
- ‘प्रीतम मुंडेंनी त्यांचा खासदार निधी कोविड सेंटरसाठी वापरावा’, वंचितची मागणी


