Share

प्रेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत

Published On: 

परभणी : सर्वाधिक इंधन दरवाढीमुळे चर्चेत आलेला परभणी जिल्हा आता तापमानात झालेल्या वाढीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात किमान तापमानात वाढ झाली असून मंगळवारी जिल्ह्यात ३६.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

यंदा ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात किमान तापमानात चढउतार होत राहिला. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमानात घट झाल्याने मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आणि किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. मात्र गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमानात वाढ होत आहे. २२ फेब्रुवारीला ३१.७ अंश सेल्सियस असलेले तापमाण आता ३६.७ सेल्सियपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे परभणीकरांना आतापासूनच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

साधारणत: मार्चच्या महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा २२ फेब्रुवारीपासून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असल्यची माहिती ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राचे डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!