हिंगोली : संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा उल्लेख सुधारित शासन परिपत्रकात करून शासकीय अभिवादन कार्यक्रमात समावेश करावा, अशी मागणी हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आणि खासदार राजीव सातव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने १४ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक काढले. मात्र या शासन परिपत्रकामध्ये थोर संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे संत शिरोमणी संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा उल्लेख करुन सुधारित शासन परिपत्रक काढावे, यासंदर्भात आपल्या स्तरावरुन संबधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनीही विचारला जाब
विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा उल्लेख शासन परिपत्रकात नसल्याचे सांगत सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्र धर्म आणि वारकरी संप्रदायाला वैश्विक करण्याचे काम करणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव शासकीय यादीतून का वगळण्यात आले, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला. सरकारला संतांचा विसर पडला का असा सवालही त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- कोरोना काळात गरीब भिकेला लागले, अन् धनदांडगे अब्जाधीश झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
