🕒 1 min read
मुंबई: मुंबईतील मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये या तरुणी ओला ड्रायव्हरला अश्लील भाषेत शिविगाळ करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ स्वतः ओला ड्रायव्हरने शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ओला ड्रायव्हरने या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी, अस आवाहन मुंबई पोलिसांना केले आहे.
https://youtu.be/KqtwxtJjdYI
पुढे त्यातील एक तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे. एवढ्यावरच न थांबता त्या तरुणीने पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली. तरी देखील अधिकाऱ्याने शांत राहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या पूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली होती. तेव्हा पोलिसांनी योग्य ती कारवाई केली होती. आता यावर पोलीस काय कारवाई करणार हे लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
