चंद्रपूर : शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याच दरम्यान राऊत यांनी ईडी आणि राज्यपाल यांच्यावर देखील टीका केली आहे.
“महाराष्ट्रात आणि बंगालमधील राज्यपाल राज्य सरकारवर निशाणा साधतात. इतरही राज्यांत राज्यपाल आहेत. इतरही राज्यांत ईडीची कार्यालये असतील. परंतु ईडी आणि राज्यपालांकडून जिथे भाजपची सत्ता नाही फक्त तिथेच निशाणा साधला जातो, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. याप्रकारच्या गोष्टी जर राजनैतिक स्वार्थासाठी वाढल्या तर देशातील परिस्थिती बिकट होईल” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

