मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलीवुडच्या हीट जोडी पैकी एक आहे. विशेष म्हणजे ते लवकरच लग्न करणार आहेत. ते दोघे “ब्रह्मास्त्र” या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यांचा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. “ब्रह्मास्त्र” हा चित्रपट लवकर रिलीज होणार असून, ह्या चित्रपटाची शूटिंग वाराणसीमध्ये सुरू आहे.
या चित्रपटामधून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना यला मिळणार आहे. यावेळी या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले असून, ट्विटरवर #Brahmastra ट्रेंडिंग चालत आहे. रणबीर आणि आलिया ही बॉलिवूडमधील प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. त्यामुळे “ब्रह्मास्त्र” चित्रपट लवकर प्रदर्शित करावा, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटामधील रणबीर आणि आलिया भट्ट यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून, हे सर्व फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या “ब्रह्मास्त्र” चित्रपटामधील गाण्याचे शूटिंगदरम्याचे आहेत.
“ब्रह्मास्त्र” चित्रपटामध्ये आलिया भट्ट ही ईशा नावाची भूमिका साकारत आसल्याचे तिने तिच्या 29व्या वाढदिवशी सांगून ब्रह्मास्त्र चित्रपटामधील पहिला लूक रिलीज केला आहे. “ब्रह्मास्त्र” चित्रपट 29 सप्टेंबर 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तसेच आलिया आणि रणबीरचा “ब्रह्मास्त्र” चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


