मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप करत आहेत. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे.
“नंदकिशोर चतुर्वेदी फरार असून त्यांना आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर लपवला आहे की रश्मी ठाकरेंनी यांनी वर्षा बंगल्यावर लपवले हे सांगावं”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ईडीने कारवाई केलेली ‘पुष्पक ग्रुप’ ही कंपनी चंद्रकांत पटेल नावाच्या व्यक्तीची असून मी पटेल याचा उद्धव ठाकरेंबरोबरच एक फोटो पाठवला आहे. त्यात हे दोघे घनिष्ट मित्र असल्यासारखे वाटत आहेत” असा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

