Share

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये रविवारी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पाोलिसांनी भाजपच्या तीन आमदारांना ताब्यात घेतले. परंतु नंतर तिघांचीही सुटका करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमदार शंकर घोष, आनंदमय बर्मन व शिखा चट्टोपाध्याय हे सफदर हाश्मी चौक येथे निदर्शने करत होते. राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केले.

उत्तर बंगालमध्ये कोरोनाच्या चाचण्यांत घट झाली आहे. त्यामुळे मृत्युसंख्येत वाढ होत चालली आहे. परंतु राज्यात रविवारपासून १५ दिवसांसाठी लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे या तीन आमदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. वास्तविक निदर्शने सुरू असलेल्या ठिकाणी जास्त लोक सहभागी झालेले नव्हते. तिन्ही आमदारांनी नियमांचे पालन केले होते. त्यामुळे त्यांची नंतर सुटका करण्यात आली.

या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम देब म्हणाले, भाजपचे नेते लॉकडाऊनच्या काळात निदर्शने करून जनतेची फसवणूक करत आहेत. भाजपचा हाच खरा चेहरा आहे.विधानसभा निवडणुकीपासून राज्यात भाजप व तृणमूल असा तीव्र वाद, संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतरही राज्यात हिंसाचार सुरू असल्याचा दावा केला जातो. त्यातच कोरोनाच्या उच्चाटनासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!