Share

करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हे अनेकदा आपल्या जुळ्या मुलांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता पुन्हा करणने सोशल मीडियावर त्याच्या मुलांचे फोटो शेअर केले आहे. आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर त्याने यश आणि रुही यांचे आगामी पावसाळ्यासाठी तयारी सुरू करत असल्याचे फोटो शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CO5Zrt9pdwb/?igshid=i5z3j9bmqmf5

यश आणि रुहीच्या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंतीस मिळाली आहे.  या  फोटोंमध्ये यश आणि रुही पांढऱ्या रंगाच्या रेनसूटमध्ये हसताना दिसत आहेत. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर त्यांनी ‘पावसाळ्याची तयारी!’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तसेच बॉलिवूडचे कलाकार देखील या फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

नुकतेच मदर डेच्या निमित्ताने करण जोहरने यश आणि रुहीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये यश आणि रुही आपल्या आजी हिरु जोहरला मदर डेच्या शुभेच्छा देत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करुन करण जोहरने भावनिक कॅप्शन लिहून आपल्या आईला मदर डेच्या शुभेच्छा दिल्या.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन हाऊसने बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि ते बॉलीवूड स्टार किड्स लाँच करण्यासाठीही ओळखले जातात.यावर्षीही त्यांचे प्रॉडक्शन हाऊस अनेक बड्या चित्रपटांची निर्मिती करत आहे. यावर्षी त्यांचे ‘शेर शाह’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘लाइगर’, ‘दोस्ताना २ ‘ असे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अलीकडेच करण जोहरने ‘अनामिका’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वरार’, ‘फॅब्युलस लाइव्ह्ज बॉलिवूड बायका २ ‘ सारख्या वेब सीरिजचीही घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!