मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे यावर्षीची राज्यसभा निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. संभाजी राजे छत्रपतींना शिवसेनेकडून पाठिंबा न मिळल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचेचे शिवसेनेचे नेते संजय पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान भाजपने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली.
भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता, हे स्पष्ट झालं आहे. यांना आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे. त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. आज भाजपच्या तीन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संजय राऊतांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले, “आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तीन लोक निवडून येणार आहेत. आमचे तीन त्यांचे तीन. त्यांनी एक उमेदवार परत घेतला पाहीजे. तर घोडेबाजाराचा काही प्रश्नच उठत नाही. जरी त्यांनी उमेदवार ठेवचा तर आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तीनही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळे सद्सद विवेक बुद्धिने देखील काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. ज्यावेळी आम्ही तीसऱ्या उमेदवाराचा अर्ज विचार करुन भरला आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

